जळगाव, दि. 1 - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासात अनेक पर्यटक येवून राहत असतात. या पर्यटकांनी दिवसभर निसर्गाचा व पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी करमणूकीसाठी व दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्याचा महामंडळाचा मानस आहे. यासाठी स्थानिक कलाकारांना विनामानधन तत्वावर पर्यटन महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय अभिमन्यु काळे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी घेतला आहे. अशी माहिती महामंडळाचे नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितिनकुमार मुंडावरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक विभागाचे कार्यक्षेत्र हे नाशिक, अहमदनगर, धुळे - नंदूरबार व जळगाव या ५ जिल्ह्यांचे आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा व शिर्डी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, जळगाव जिल्ह्यात जळगाव व नंदूरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे पर्यटक निवास आहेत. महामंडळाच्या या निर्णयामुळे या निवास परिसरातील संस्था किंवा व्यक्तींना तसेच होतकरु कलाकारांना आपली कला ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांपुढे सादर करण्याची संधी व व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर यातून स्थानिक लोककला, संस्कृती जोपासण्याचेही काम होईल. तसेच चित्रकार, फोटोग्राफर यांना रिसोर्टमध्ये प्रत्यक्ष चित्र काढण्यास, फोटो घेण्याचा उपक्रम राबवून त्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
विना मानधन तत्वावर आपली कला महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये सादर करु इच्छिणाऱ्यांनी आपली नांवनोदणी जिल्हावार संपर्क अधिका-यांकडे करावी, किंवा ई-मेल वरुन कळवावे. असे आवाहन श्री. मुंडावरे प्रादेशिक व्यवस्थापक, नाशिक यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा-नाशिक-श्री. नितीन नागपूरे व श्री. द. तु. मोकळ, मो. क्र. ९५६१३४०८३३, ईमेल- ronashik@maharashtratourism.gov.in. त्र्यंबकेश्वर-श्री मुकेश पाटील, मो. क्र. ९८८१३२९३९०, श्री. ज्ञानेश्वर माऊली- ०२५९४-२३३१४३, ई-मेल- hotelsanskruti2009@gmail.com,
अहमदनगर जिल्हा-शिर्डी- श्री सुभाष अडसुळे, मो. क्र. ८४२२८२२०८८, ईमेल-shirdi@maharashtratourism.gov.in भंडारदरा- श्री. कि. वा. उगले, मो. क्र.८८०६६९६१०७, ईमेल-bhandardara@maharashtratourism.gov.in
जळगाव जिल्हा-श्री. सुनील जाधव व श्री. प्रदीप साबळे-०२५७-२२२२४८१/२ ई-मेल- hoteltouristresort@gmail.com.
अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाशी ०२५३-२५७००५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
000

No comments:
Post a Comment