जळगाव, दि. 15 :- जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , डॉ.अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट
सेंटर, आणि महानगरपालिका यांचे संयुक्त
विद्यमाने दि. 19 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजेपासून के.सी.ई सोसायटी
इंजिनियरींग कॉलेज परीसर, जिल्हा उद्योग केंद्रामागे, नॅशनल हायवे क्र. 6 जळगाव
येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या
मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी रिक्त पदांची मागणी कळविलेली आहे. एकूण- 400
रिक्तपदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून त्यासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी आय.टि.आय पास, पदवीधर अशी आहे.
उद्योजकांना विविध
रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे.रोजगार मेळाव्यास पात्र
उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे
आहे. येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यांदीसह
दिनांक 19 डिसेंबर 2018 रोजी ठीक 10 वाजता केसीई सोसायटी इंजिनियरींग कॉलेज परीसर,
जिल्हा उदयोग केंद्रामागे, नॅशनल हायवे क्र. 6 जळगाव येथे उपस्थित रहावे. रोजगार नियोक्त्यांकडून देण्यात येणाऱ्या वेतन व इतर भत्यांबाबत पंडीत दिनदयान उपाध्याय रोजगार मेळाव्याचे
दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी माहिती देणार आहेत.
तरी
रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे,आवाहन सहाय्यक संचालिका
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,जळगाव श्रीमती. अनिसा
तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
000
No comments:
Post a Comment