Friday, 21 December 2018

जामनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात पद भरती


        जळगाव, दिनांक 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर, जि. जळगाव येथे विजतंत्री, तारतंत्री, जोडारी,  कातारी, यांत्रिकी मोटार गाडी, यांत्रिकी डिझेल, संघाता, कोपा, ड्रेस मेकींग, गणित व एम्लॉयबीलीटी स्क्रिल या व्यवसायातील रिक्त पदांकरिता तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपाची शिल्पनिदेशकांची पदे भरण्यात येणार आहे.
          याकरिता इच्छूक उमेदवारांनी दिनांक २६ डिसेंबर, २०१८ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात शैक्षणिक अर्हतेच्या सत्यप्रतींसह अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५८०-२३०१५३ येथे संपर्क साधावा, असे  आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
० ० ० ०

No comments:

Post a Comment