जळगाव, दि. 21 - जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व नवबौध्द घटकातील युवतीसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण दि. 1 जानेवारी 2019 पासून हनुमान व्यायाम शाळा, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करुन पाठविण्यात येणार असून ही निवड चाचणी 24 डिसेंबर, 2018 रोजी पोलीस कवायत मैदान, नवीन बसस्थानकासमोर, जळगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. 18 ते 25 वर्षे वयोमर्यादेतील विद्यार्थ्यानी उपस्थित रहावे. येतांना जातीचा दाखला, बारावी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, रहिवासी दाखला, दोन पासपोर्ट फोटो व शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती सोबत आणाव्यात. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment