जळगाव
दि. 27- जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
खाडीलकरांच्या यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार
पडली.
याप्रसंगी
जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे,
सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री.बेंडकुळे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण
कंपनीचे कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे
प्रतिनिधी एस.एम.बाविस्कर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, हे शासकीय
सदस्य तर अशासकीय सदस्य राहुल बोरसे, डॉ.अर्चना पाटील, धनंजय पाटील, ॲङ मंजुळा
कचरु मुंदडा, डॉ.परिक्षीत बाविस्कर,विलास महाजन, बाळकृष्ण वाणी, सतीष गडे, उज्वला
देशपांडे, विजय मोहरिर, मकसुद हुसेन बोहरी, बापू महाजन, विजय पारख, कल्पना पाटील,
सुरेश रोकडे, नरेंद्र पाटील हे सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी
अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व संबंधित विभागाकडून मागिल सभेतील
तक्रारींचा आढाव घेवून उप प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न औषध प्रशासन विभाग, जिल्हा
सामान्य रुग्णालय, गॅस वितरण, स्वस्त धान्य दुकाना संदर्भातील तक्रारींबाबत आढावा
घेतला. तसेच पुढील बैठकीपर्यत
सर्व अडचणी सोडवून वंचितांना न्याय द्यावा. अशा सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
गाडीलवार यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.
दर दोन वर्षांनी गॅस हंडी, शेगडीचे
निरिक्षण होणे अनिवार्य
बैठकीत
बोलतांना जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गोविंद शिंदे यांनी सर्व गॅस ग्राहकांना
आवाहन केले की, त्यांना सुरक्षेचा उपाय म्हणून दर दोन वर्षातून किमान एकदा तरी
आपले गॅस शेगडी, हंडी, नळी, रेग्यूलेटर इत्यादि साहित्याची गॅस वितरण कंपनीच्या
अधिकृत प्रतिनिधींकडून निरिक्षण करून त्यांनी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन
करावे. तसेच गॅस वितरण करणाऱ्या लोकांना गॅस धारकांनी निर्धारित रकमेपेक्षा जास्त
रक्कम देवू नये. कोणी गॅस डिलिव्हर निर्धारित रकमेपेक्षा जास्त पैसे मागत असल्यास
संबंधित एजन्सिकडे तक्रार करावी. अशा सूचनाही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्यात.
शेवटी
जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे यांनी
सर्व उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment