ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी
यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव, दि.10- सैनिकांच्या कामासाठी आपण
तत्पर उपलब्ध असून ,सैनिकांच्या समस्या
सोडविण्यास आपले प्रथम प्राधान्य राहीले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी आज केले.
माजी सैनिक
विश्रामगृह, महाबळ येथे सन 2018 या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते दिप प्रज्वलन
करुन झाला. यावेळी जळगाव जिल्हयातील 17 शहिद सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात
आली यावेळी ते बोलत होते.
यावेळी
कर्नल एस. बाबर कमांडिग ऑफीसर 18 महाराष्ट्र एन. सी.सी बटालियन, जळगाव , प्रसिध्द
कवी विष्णु बापट, सेवा निवृत्त सैनिक
अधिकारी कर्नल पी. आर सिंह, कमांडर श्रीधर मोरे, मेजर यशवंत लिमये, कॅप्टन मोहन
कुलकर्णी ,अधिकारी व कर्मचारी व माजी सैनिक मोठया संख्येन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
म्हणाले सैनिकाच्या कामांसाठी आपण तत्पर हजर आहोत. सैनिकांच्या समस्या
सोडविण्यासाठी कोणतीही अडचण आली तर सैनिकांनी आपल्याला भेटावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले
सैनिक कल्याणासाठी की 1 कोटी 18 लाख
रुपयांचे उद्दिष्ट असून ते आपल्या सर्वाच्या सहकार्याने पूर्ण करु. सैनिक कल्याण
निधी साठी कोणीही मागे राहणार नाही असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमाता पिता
यांचा शॉल साडी, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला
आपल्या
प्रस्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
म्हणाले की, 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे धनादेश आज वितरीत करण्यात आले, तर वर्षभरात 19 लाख 81
हजार रुपयांचा आर्थिक निधी वितरीत करण्यात आला असल्याचे त्यांनी
सांगितले.
कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील
सहाय्यक कल्याण अधिकारी बी. आर. काळे, अनुरथ
वाकडे, राजेंद्र कत्ते , विलास इंगळे , शिवशंकर झाडोकार आदिंनी परिश्रम घेतला.
०००
No comments:
Post a Comment