जळगाव, दि. 20 - भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरीकांसाठी दाखविण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट
मशीनच्या प्रात्याक्षिकावेळी यंत्रणेने जास्तीत जास्त नागरीकांना सहभागी करुन
घ्यावे व त्यांच्या शंकाचे निरसण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी आज दिले.
येत्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी
कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटबरोबरच व्हीव्हीपॅट मशीनही वापरण्यात येणार आहे. या
मशीनचा प्रचार व प्रसिध्दी होण्यासाठी प्रात्याक्षिक जिल्ह्यातील निवडणूक
यंत्रणेमार्फत सर्व मतदान केंद्रावर देण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक यंत्रणेतील
अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी
श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अपर
जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, जिल्ह्यातील
उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, जितेंद्र पाटील, डॉ. श्रीकुमार चिंचकर, विजयानंद
शर्मा, शरद पवार, राजेंद्र कचरे, अजित थोरबोले, निवडणूक तहसीलदार श्री. सुरेश
थोरात आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.
निबाळकर पुढे म्हणाले की, निवडणूकीसाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर प्रथमच होत
असल्याने निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वप्रथम या मशीनची
चांगल्याप्रकारे माहिती करुन घ्यावी. जेणेकरुन नागरीकांना या मशीनबाबत माहिती देता
येईल. मशीनचे प्रात्यक्षिक सादर करताना निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे
तंतोतंत पालन करावे. प्रात्यक्षिकाच्यावेळी बीएलओ, आशावर्कर व गावातील जास्तीत
जास्त नवमतदार उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. मशीनबाबत नागरीकांना असणाऱ्या
शंकांचे निरसण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत.
यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र
कचरे, डॉ. श्रीकुमार चिंचकर व अजित थोरबोले यांनी उपस्थितांना मशीनची तांत्रिक
माहिती दिली. त्याचबरोबर कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट मशीन यांची
जोडणी करणे, मतदाराने मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनद्वारे येणारी स्लीप याचे
प्रात्यक्षिक करुन दाखविले.
जिल्ह्यातील 3532 मतदार केंद्रासाठी
आवश्यक तेवढे व्हीव्हीपॅट मशीन प्राप्त झाले असून पुढील दिड महिन्यात जिल्ह्यातील
सर्व मतदान केंद्रावर या मशीनचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक
विधानसभा क्षेत्रासाठी चार मशीन व एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहा कर्मचाऱ्यांचे पथक
नेमण्यात आले आहे. ही पथके दररोज विविध मतदान केंद्रावर जाऊन नागरीकांना
मशीनबाबतची माहिती तसेच प्रात्यक्षिक दाखवतील अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी
प्रमोद भामरे यांनी दिली. तसेच तहसीलदार श्री. थोरात यांनीही मशीनच्या
प्रात्यक्षिकाबाबत माहिती दिली.
या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील सर्व
तालुक्यांचे तहसीलदार, नायब तहसीलदार व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment