Friday, 21 December 2018

महारेशीम नावनोंदणी अभियानाची चित्ररथाव्दारे जनजागृती


      जळगाव, दिनांक 18 : रेशीम संचालनालय, नागपुर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, जळगाव मार्फत महारेशीम नाव नोंदणी महाअभियान चित्ररथाचे उदघाटन करण्यात आले. सदरच्या महारेशीम नाव नोंदणी अभियानाच्या चित्ररथला अपर जिल्हाधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हयातील शेतकरी बांधवांच्या रेशीम नाव नोंदणी अभियानाच्या चित्ररथास मार्गस्थ करुन जिल्हयातील शेतक-यांनी कमी पाण्यात, कमी खर्चात उत्पन्नाची व बाजारभावाची हमी असलेल्या तसेच किटकनाशकेमुक्त रेशीम शेतीत शेतक-यांनी सहभाग नोंदवावा असे अवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संभाजी ठाकुर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. प्रतापराव पाटील, प्रकल्प संचालक ( आत्मा) श्री कांतीलाल महाजन तसेच जळगव जिल्हयातील प्रगतीशील रेशीम उद्योजक शेतकरी श्री मधुकर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
       या  अभियानाचा मुख्य उद्देश जिल्हयातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना रेशीम उद्योगामध्ये सहभागी करुन घेणे, रोजगार उपलब्ध करुन देणे, त्याचबरोबर कमी खर्चात रेशीम शाश्वत शेतीबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त शेतक-यांना या अभियानाचा लाभ मिळणेसाठी रेशीम शेतीबाबत उपयुक्त माहिती चित्ररथावर देण्यात आली आहे.
तसेच रेशीम संचलनालया अंतर्गत असलेल्या शासकीय योजना व सवलती याबाबत माहिती ग्राम सभा घेवून बागायतदार व अल्पभूधारक शेतकरी यांना रेशीम शेती साठी प्रोत्साहित करणे असा आहे.
        रेशीम उद्योगाची सुरूवात सन 2018-19 पासुन करण्यात आली असुन जिल्हयातील तुती लागवडी खालील क्षेत्र 15 एकर वरुन 215 एकर करण्यात आले आहे.
        महारेशीम अभियान हे जिल्हयात दिनांक 15 ते 29 डिसेंबर, 2018 पर्यत कार्यान्वीत राहणार आहे. सदर अभियानातर्गत चित्ररथ जिल्हयातील जामनेर, भुसावळ, यावल, जळगाव, बोदवड, उरंडोल व चाळीसगाव या तालुक्यातील विविध गावात ज्या ग्रामपंचायती अंतर्गत 20 ते 25 शेतकरी रेशीम उद्योग करु इच्छित आहेत अशा गावात फिरुन रेशीम नावनोंदणी करण्यात येईल. तरी सदर अभियानाचा जास्तीय जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व श्री. चंद्रकांत बडगुजर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जळगाव यांचेमार्फत करण्यात आले आहे.
        अधिक  माहितीसाठी श्री. चंद्रकांत बडगुजर -9860249541 व श्री. रविंद्र सांगळे 9158644121 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                       ० ० ०

No comments:

Post a Comment