*प्रत्येकाने वाचन संस्कृतीचा प्रचार व
प्रसार करावा
*वाचन चिंतन व मनन हे पुस्तकांव्दारेच
होवू शकते
*ग्रंथ दिंडीचे जल्लेषात उदघाटन – लेझीम
पथकांनी लोकांचे मने जिंकली
जळगाव, दि.10- इंटरनेट व
मोबाईलच्या युगातही वाचन संस्कृती टिकून आहे. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा
यासाठी प्रत्येकाने पुस्तके खरेदी करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी आज केले.
लेवा बोर्डिग परिसरातील सरस्वती हॉल
येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय
ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी दिप प्रज्वलन व सरस्वती पुजनाने केले. या प्रसंगी कुटूंब रंगलय काव्याचे सादरकर्ते विसुभाऊ बापट, प्र सहाय्यक ग्रंथालय संचालक
सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
म्हणाले की, वाचन, चिंतन व मनन हे पुस्तकांच्या माध्यमातूनच होवू शकते, वाचन
संस्कृती घराघरात टिकवून ठेवण्यासाठी लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करण्याची
गरज आहे. प्रत्येक जण महागडा मोबाईल वापरतात, परंतू कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे
पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत असे पुस्तके प्रत्येकाने खरेदी करावती असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कुटूंब रंगलय काव्यात गिनीज बुक
ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला अनोखा कार्यक्रमाचे सादरकर्ते विसुभाऊ बापट
म्हणाले की, माय मराठीचा -हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने मराठीचे वाचन करावे , यातून वाचन संस्कृतीला चालणा मिळेल . ग्रंथ हे समाजाला दिशा देण्याचे
काम करतात , त्यामुळे या ग्रंथोत्सवात
वेगवेगळे पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून यातून आपण ग्रंथ खरेदी करुन
आपली वाचन संस्कृती टिकवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विसुभाऊ
बापट पुढे म्हणाले की, सरस्वतीच्या आर्शिवादापुढे कुटूंब रंगलय काव्यात या अनोख्या
कार्यक्रमाचे ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचेही त्यांनी
यावेळी सांगितले.
प्रारंभी बहिणाबाई उद्यान येथे आयोजित ग्रंथ
दिंडीचे महापौर सिमा भोळे व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ग्रंथ दिडी
पुजन करुन ग्रंथ दिडीचे उदघाटन केले. यावेळी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी
दिवेकर उपस्थित होते.
महापौर
सीमा भोळे व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी
शिवाजी दिवेकर यांनी ग्रंथदिडी खांद्यावर
घेवून ग्रंथदिडीत सहभागी झाले.
ग्रंथदिडीचे बहिणाबाई उद्यान ते
सरस्वती हॉल पर्यत ढोल, लेझीम मृंदगच्या गजरात आगमन झाले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी दरवर्षी आयोजित करण्यात
येत असलेल्या ग्रंथोत्सवाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
या दोन दिवशी ग्रंथोत्सवात 20 स्टॉल लावण्यात
आले असून सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन व पुस्तके विक्रीचे आयोजन
करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवातील पहिल्या
सत्रात दुपारी तीन वाजता सुरवात होईल. यात सार्वजनिक ग्रंथालयांची आधुनिकतेकडे
वाटचाल या विषयाचा परिसंवाद होईल यात त्रयंबक कापडे, विनय पाटील, राहुल रनाळकर व विजय
श्रीकांत कंची यांचा सहभाग असेल दुसरे सत्र दुपारी 5 ते सायंकाळी 8 यावेळेत होईल
यात काव्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. काव्य संमेलनाच्या
अध्यक्षस्थानी डॉ. किसन पाटील , हे राहणार आहेत. यात अशोक सोनवणे, अशोक कोतवाल,
प्रा. वा.ना.आंधळे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, डॉ. मिलींद बागुल, माया धुप्पड, डॉ
अशोक कोळी अ.पु. भालेराव, सत्यजित साळवे, प्रा. डॉ. रमेश माने, डॉ. अस्मिता गुरव,
व सुखदेव वाघ यांचा सहभाग असेल तसेच संध्याकाळी 6 ते 8 वेळेत विसुभाऊ बापट यांचा
गिनींज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये नोंदवलेला कुटुंब रंगलय काव्यात कार्यक्रम
होणार आहे. मंगळवार दि. 11 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत
21 व्या सतकातील आव्हाने, आणि गांधी विचारांची आवश्यकता या विषयावर श्री भुजुंगराव
बोबडे यांचे व्याख्यान, दुपारी 3 ते 5
वाजेपर्यंत स्पर्धा परिक्षा संभ्रम आणी वास्तव , मात जयेंद्र लेकुरवाडे, गोपाल दर्जी व विकास भदाणे सहभागी
होतील, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत मिझा एक्सप्रेस तुफान दिनोदी कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले असल्याचेही जिल्हा गंथालय अधिकारी रोकडे यांनी सांगितले.
यावेळी
माहिती व जनसंपर्क विभागामार्फत दर महिन्याला प्रकाशित होणा-या लोकराज्य मासिकाचे
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर विसुभाऊ बापट यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात
आले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुहास रोकडे यांनी मानले.
या
ग्रंथोत्सव दिंडीत रावसाहेब रुपचंद विद्यालय, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय,
पुष्पावती खुशाल गुळवे, मुलीचे विद्यालय, न्यू इंग्लीश मेडियम स्कूल व विविध
शाळांचे लेझीम व ढोल पथके सहभागी झाले होते.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची
ग्रंथोत्सवास भेट
राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरस्वती हॉल येथे आयोजित
ग्रंथोत्सवास भेट दिवून स्टॉलची पहाणी केली. यावेळी राज्यमंत्री गुलबराव पाटील
म्हणाले की, माणसाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीमध्ये वाचन संस्कृतीचे खूप महत्व आहे. वाचकांमध्ये
वाचनाची गोडी वृध्दींगत होण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम खरोखरच सतृत्य असू ग्रंथोत्सवाचे आयोजनाबाबत
ग्रंथात्सवातील अधिकारी व कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या,
गुलाबराव
पाटील पुढे म्हणाले की, ग्रंथालयातील अधिकारी व कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न
मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येईल. असेही त्यांनी
यावेळी सांगितले.
लोकराज्य स्टॉलला भेट
सहकार
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रंथोत्सवात माहिती व जनसंपर्क महासंचालनालया
मार्फत लावण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला भेट देवून समाधान व्यक्त केले. यावेळी
त्यांना माहे डिसेंबर महिन्याचा क्रांतिसुर्याला विनम्र अभिवादन हा लोकराज्य अंक
भेट देण्यात आला.
000000
No comments:
Post a Comment