Tuesday, 4 December 2018

देवळाली कॅम्प येथे 16 ते 18 डिसेंबरदरम्यान सैन्य भरतीचे आयोजन सोल्जर अन ट्रेडमन पदासाठी पात्र उमेदवारांनी सहभागी होण्याचे लष्कराचे आवाहन


        जळगाव, दि. 4 - लष्कराची छावणी असलेल्या देवळालीतील टेरॉटोरियल (T.A) ' थल सेना '  आर्मी 116 इंफ्रट्री बटालियनमध्ये सोल्जर (सैनिक) व विविध ट्रेडमनच्या  पदासाठी 16 ते 18 डिसेंबर दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
            येथील धोंडीरोडवरील टीए पॅराच्या मैदानावर 8 राज्यांसह 3 केंद्रशासित प्रदेशातील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतील अशी माहिती मेजर आकाशदिप सिंग यांनी पत्रकान्वये दिली आहे.
            हि भरती प्रक्रिया तीन प्रकारे होणार असून यामध्ये दि.16 डिसेंबर रोजी महाराष्ट्राबाहेरील उमेदवार, दि.17 रोजी नाशिक वगळता महाराष्ट्र तर दि.18 रोजी केवळ नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. दिलेल्या तारखेनुसार संबंधित भागातील उमेदवारांनी उपस्थित रहावे.
            सदर भरतीप्रक्रियेत महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गोवा त्याचप्रमाणे दादरा नगर हवेली, दिव दमण व लक्षद्वीप आणि पौंडीचेरी येथील उमेदवारांना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोल्जर व ट्रेडमन पदाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा 18 ते 42 वर्ष, शैक्षणिक पात्रता-किमान दहावी उत्तीर्ण अथवा त्यापुढील शैक्षणिक पात्रता असावी. सामान्य सोल्जरसाठी किमान 10 वी क्लर्कपदासाठी 12 वी तर हाऊस किपर (8 वी) वगळता अन्य स्वयंपाकी, हेअर ड्रेसर, धोबी या पदांसाठी 10 वी सह संबंधित कामामध्ये प्राविण्य असले पाहिजे. 12 वी मध्ये 45 % गुण असणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांची उंची 160 से.मी. वजन 50 किलो छाती न फुगवता 77 सेमी.तर फुगवून 82 सेमी अशी शारीरिक क्षमता तर उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये एक मैल धावणे, लांब उडी, पूल अप्स, झिगझॅग, बॅलन्स आदी प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी, त्यांचा मुलगा, मुलगा नसल्यास जावई यांना शारीरिक क्षमतेत उंची 2 सेमी, वजन 2 किलो, छाती 1 सेमी तर तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू उंचीमध्ये 3 सेमी, वजन 3 किलो, छाती 3 सेमी अशी सुट देण्यात आली आहे. उमेदवारांना सैन्यदलासाठीच्या शारीरिक क्षमता असणे बंधनकारक आहे. पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी लेखी स्वरूपात देखील घेण्यात येईल. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये होईल. यामध्ये सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, गणित, तर्क वितर्क तर क्लेरिकल पदासाठी सामान्य ज्ञान, विज्ञान, गणित, संगणक विज्ञान व सामान्य इंग्रजी अशा विषयांवर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याची सर्व उमेदवारांनी दखल घेत भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन लष्कराच्या सूत्रांनी केले असून सहभागी होणाऱ्या उमेदवारांच्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर कुठल्याही प्रकारचा टॅटू किंवा गोंदलेले असल्यास भरतीमध्ये सहभागीच होऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित व गैरवर्तन उमेदवाराकडून होणार नाही याची दखल घ्यावी.
सोबत आवश्यक कागदपत्रे
            जन्म दाखला, शैक्षणिक, क्रीडा, रहिवासी दाखला, विवाहित अथवा अविवाहित असल्याचा पुरावा, 6 महिन्यापर्यंतचा चारित्र्य दाखला, जातीचे दाखले, प्रतिज्ञापत्र यांसह सर्व शैक्षणिक पात्रता असलेले मार्कशीट, सर्व मुळ प्रमाणपत्र व नुकतेच काढलेले 20 पासपोर्ट साईज फोटो, माजी सैनिक, शाहिद जवान व वीरपत्नीचे प्रमाणपत्र, शालेय व महाविद्यालयीन काळामधील खेळात मिळवलेले प्रमाणपत्रे भरतीसाठी येतांना सोबत आणावे.  
000

No comments:

Post a Comment