जळगाव,दि.२७:- या वर्षातील संभाव्य
चारा टंचाई विचारात घेता, पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील पशुधन जगविण्याचा विचार
करणेसाठी सकारात्मक उद्देशाने राज्यभरात सद्यस्थितीत उपलब्ध हिरवा चारा, पिके व
वाळलेला चारा ह्या साधनसामुग्रीचे सुयोग्य शास्त्रोक्त पध्दतीने नियोजन करण्यात येत
आहे.
दि.
१ ते १० जानेवारी, २०१९ या कालावधित चारा साक्षरता अभियान राबविण्याचे निर्देश
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात
कामधेनू योजनेच्या धर्तीवर (३०० प्रजननक्षम गाई / म्हशी) दोन प्रशिक्षण शिबीराचे
आयोजन अगदी सोप्या
पध्दतीने करावयाचे
आहे.
या
अभियानात गावातील पंचायत सभागृह, समाज मंदीर, चावडी, जिल्हा परिषद शाळेचे पटांगण,
दुध संकलन केंद्र किंवा तत्सम ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या
अभियानात पशुपालक व शेतकरी बांधवाना उपलब्ध हिरवा, वाळलेल्या चा-याचे सुयोग्य
नियोजन, बचत तसेच व्यवस्थापन, चाऱ्यापासून मूरघास तयार करणे व टिकवणे चा-याची
सकसता व पाकता वाढविणे, अझोला व हायड्रोफोनीक्स, तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिक व
ध्वनीफित दाखविणे, यात स्वयंस्फुर्तीने लोक प्रतिनिधींना सहभागी व्हावे. असे आवाहन पशुसंवर्धन
विभागातर्फे करण्यातआले आहे.
चारा
उत्पादन, साठवणूक व प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती कृषि अधिकारी व पशुसंवर्धन
अधिकारी यांचेमार्फत देण्यात येणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment