Friday, 21 December 2018

आधार पडताळणी पूर्ण केलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच जानेवारी पासून धान्य वितरण होणार - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

                     •    पात्र शिधापत्रिकाधारकांनी 25 डिसेंबर पर्यंत आधार पडताळणी करुन घ्यावी
           जळगाव, दि. 21- जिल्हयात शासन निर्देशानुसार आधार पडताळणी अंती पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते  आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिसेंबर 2018 हा महिना शिधापत्रिका व त्यातील सदस्य पडताळणी महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करतांना सर्व शिधापत्रिकाधारकांची व त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार पडताळणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.
     जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीव्दारे अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांनी आपल्याकडील आधारकार्डच्या प्रतिसह स्वस्त धान्य दुकानांमध्ये अथवा दुकानदार सदर कामासाठी गृहभेटी देतेवेळी उपस्थित राहून कुटुंबातील सर्व सदस्यांची 100 टक्के आधार पडताळणी दि. 25 डिसेंबर 2018 पावेतो पूर्ण करुन घ्यावी. माहे जानेवारी 2019 पासून आधार पडताळणी पूर्ण केलेल्या शिधापत्रिका धारकांनाच अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार असल्याने त्यांनी या मोहिमेत सर्व रास्तभाव दुकानदारांना सहकार्य करावे.
     या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी सर्व तहसिलदार यांना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या असल्याने याबाबतच्या अडचणीबाबत आपल्या नजीकच्या तहसील कार्यालयातील तहसीलदार अथवा पुरवठा शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
                                                                             ०००

No comments:

Post a Comment