जळगाव, दि. 17 - दर महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
या लोकशाही दिनात आठ तक्रार अर्ज प्राप्त
झाले. यापैकी विभागीय अधिकारी, एमआयडीसी, धुळे यांचेकडील एक अर्ज, जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था यांच्याकडील दोन अर्ज, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)
यांच्याकडील दोन अर्ज, प्रकल्प अधिकारी, यावल यांच्याकडील एक अर्ज, पोलीस विभाग
यांच्याकडील एक अर्ज, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडील
एक अर्ज होता.
यावेळी अपर जिल्हाधिकारी, महिला
वरीष्ठ पोलिस अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक
सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे
प्रतिनिधी व संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षांनी महिला लोकशाही
दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जांचा आढावा घेऊन तक्रार अर्ज लवकरात लवकर
निकाली काढण्याच्या सुचना दिल्यात. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment