Saturday, 15 December 2018

जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी १५ जानेवारी पर्यंत यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रीया पूर्ण करावी - जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था


        जळगाव, दि. १५:- राज्यात जलशिवार अभियान/जल व मृदसंधारणाची कामे करण्यासाठी "जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामृग्री व्याज अर्थसहाय्य योजना " महाराष्ट्र शासन, मृद संधारण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. व दिनांक २९ ऑक्टोंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत निकष निश्चित करण्यांत आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
            राज्य शासनाकडून  प्राप्त ४९ सुशिक्षित बेरोजगारांपैकी  वेळोवेळी निर्गमित केलेल्या  शासन परिपत्रक व निकषांनुसार पहिल्या टप्यात १८ पैकी ८ व दुसऱ्या टप्प्यात २ पैकी १ असे एकुण ९ लाभार्थ्यांची  योजनेअंतर्गत निवड करण्यांत आली असुन त्यांनी जे.सी.बी.मशिन खरेदी केली आहेंत. उर्वरीत ११ लोकांना जे.सी.बी.मशीन खरेदीसाठी दिनांक १५ डिसेंबर २०१८ पासुन १ महिन्याची मुदतवाढ देण्यांत येत आहे. तेव्हा यापुर्वी निवडण्यांत आलेल्या लाभार्थ्यांनी कर्जवाटपा संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करावी. 
            सदर योजनेंतर्गत उर्वरीत २९ पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांची सोडत काढुन लाभार्थी यादी व प्रतिक्षा यादी तयार करावयाची आहे व निवडण्यांत आलेल्या पात्र अर्जदारांना वित्तीय संस्थांकडुन कर्जवाटपासाठी १ महिन्याची मुदत देण्यांत येत आहे. तेव्हा उर्वरीत २९ लोकांनी दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांच्या कार्यालयास उपस्थित राहावे. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment