Tuesday, 31 July 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 31 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            बुधवार दि. 1 ऑगस्ट 2018 रोजी अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्थानक जि. जळगांव येथे आगमन व खाजगी / शासकीय वाहनाने दोंडाईचा जि. धुळकडे प्रयाण.
00000

जिल्ह्यात 37 (1) (3) चे मनाई आदेश जारी

जळगाव,दि.31- जळगाव शहरात दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी महानगरपालिका मतदान होणार असुन दिनांक 3 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणी  होणार आहे. याच काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदचे आवाहन केले  आहे. याचा परिणाम जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकांवर होवुन कायदा व सुव्यवस्था  अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3)अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि.1 ऑगस्ट 2018  ते 15 ऑगस्ट 2018 पर्यंत अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी कळविले आहे.
०००००

Monday, 30 July 2018

महानगरपालिका निवडणुक मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत द्यावी


जळगाव, दि. ३०-  जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८  कार्यक्रमानुसार     दि.  १ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायं ५.३० वाजेपावेतो मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक कार्यक्षत्रातील  राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये,निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान , सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्नगृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमधील कामगार, व्यक्तींना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक भरपगारी सुटी  अथवा दोन तासांची सवलत मतदानाच्या दिवशी १ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त चंद्रकांत डांगे जळगाव शहर महानगरपालिका जळगाव  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहेत.
०००००

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन


       जळगाव, दि. 30 - जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, 6 ऑगस्ट, 2018 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन भवनात आयोजित करण्यात आला आहे.
            या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  केले आहे.
0000000

महानगरपालिका निवडणुक मतदानासाठी आस्थापनांनी सुटी अथवा दोन तासांची सवलत द्यावी


        जळगाव, दि. 30 : जळगाव महानगरपालिकेच्या 1 ऑगस्ट 2018 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा  दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त श्री. डांगे यांनी म्हटले आहे, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या,शॉपिंग सेंटर्स ,मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना यांना  सूचना देण्यात आल्या आहेत. या आस्थापनांनी कामागारांना या दिवशी सुटी अथवा मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ झेडए अन्वये राज्य निवडणूक आयोगावर महानगरपालिकांच्या / जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकांची जबाबदारी सोपविली आहे. मुंबई प्रतिक महानिपालिका अधिनियम १९४९ चे कलम १४ (४) मधील तरतुदीनुसार निवडणूका शांत, मुक्त व निर्भय वातावरणात घेण्याकरिता निदेश देण्यात आले आहेत.
या निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी अथवा कामाच्या तासांमधून मतदान करण्याकरिता दोन तासांची सवलत देण्याबाबत योग्य ते निर्देश सर्व संबंधितांना तात्काळ देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये राज्य निवडणूक आयोग यांनी कळविलेले आहे.
या पार्श्वभूमीवर उपरोक्त मतदान क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना आस्थापना यांनी सूचना देण्यात येत आहे, की आपल्या आस्थापनामधील कामागरांना या निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी.
मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या  प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील / उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम / अखंडित उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यामधील कामागरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी.
०००००