Friday, 13 July 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


       जळगाव, दि. 13 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे  शनिवार व रविवार दिनांक 14 व 15 जूलै, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
          शनिवार, दि. 14 जुलै, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत  पाळधी, ता. धरणगाव  येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील  विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाचोराकडे प्रयाण, दुपारी 2 वा. पाचोरा येथे दि. पाचोरा पिपल्स को. ऑफ. बँक लि. यांच्या सभासद पाल्यांचा पारीतोषिक वितरण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायं 6 वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
             रविवार, दि. 15 जुलै, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००

No comments:

Post a Comment