Wednesday, 11 July 2018

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूकीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

    
      जळगाव, दि. 11 - जिल्ह्यातील नवनिर्मित मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 15 जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज आढावा घेतला.
     सर्वप्रथम जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी तहसील कार्यालयात जाऊन या निवडणूकीसाठी वापरण्यात येणार असलेले ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉगरुमची पाहणी केली. तसेच मतदार याद्यांमधील दुबार नावे व मयत असलेल्या व्यक्तींची नावे याबाबतची माहिती घेतली. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदान केंद्र, प्रत्येक प्रभागातील पक्षनिहाय निवडणूक लढवित असलेले उमेदवार, त्यांनी सादर केलेले खर्च, प्रचारासाठी वापरण्यात येत असलेली वाहने व इतर बाबींची घेतलेली परवानगी, मतदान व मतमोजणीच्यावेळी ठेवण्यात येणारा पोलीस बंदोबस्त, निवडणूक साहित्य याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर मतमोजणी केंद्रास भेट देऊन तेथील तयारीचाही आढावा घेऊन निवडणूक निर्भयपणे पार पडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सुचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
     यावेळी जिल्हाधिकारी यांचेसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मनोज देशमुख, मुख्याधिकारी श्री. सोमनाथ आढाव यांचेसह निवडणूकीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
                                                                            000

No comments:

Post a Comment