जळगाव, दि.12:- महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966
(1966 महा. 41) च्या कलम 328 च्या पोट कलम (1) आणि पोट – कलम (2) च्या खंड (त्रेसष्ठ)
अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत समर्थ करणा-या इतर सर्व
अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बध) नियम 1968
यामध्ये सुधारणा करणे कामी जे नियम योजिले आहे. त्या नियमांचा पुढील मसुदा उक्त
संहितेच्या कलम 329, पोट-कलम (1) व्दारे आवश्यक असल्याने त्याव्दारे बाधा
पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तीच्या माहितीसाठी दिनांक 12 जुन 2018 रोजी
अधिसुचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या अधिसूचने मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल
(जमिनीच्या वापरावर निर्बध) नियम 1968 च्या नियम (2) मधील सुधारणा बाबत उक्त
मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून येणा-या / प्राप्त होणा-या हरकती व
सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येणार आहेत.
तरी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या
वापरावर निर्बध) नियम 1968 च्या नियम (2) मधील सुधारणा बाबत आपल्या जिल्हयातील
ज्या व्यक्तींना सदरच्या अधिसूचनेतील हरकत किंवा सूचना घ्यावयाच्या असतील त्यांनी
दिनांक 15 जुलै 2018 पावेतो शासनाकडे लेखी सूचना किंवा हरकती सादर करणेबाबतचे
आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment