जळगाव, दि. 13 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि
सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) कृषि व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
ना. चंद्रकात पाटील हे रविवार दि. 15 जुलै, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
रविवार, दि. 15 जुलै, 2018
रोजी दुपारी 12 वा. 8 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने ए. टी.
झांबरे शाळा जळगावकडे प्रयाण, दुपारी 12 वा. 30 मि. नी श्री. भरत अमळकर यांच्या पयास बंगला, ए. टी.
झांबरे शाळेच्या समोरील निवासस्थानी आगमन व राखीव, सायं 7 वा 35 मि.नी. श्री. संजय
भावसार यांच्या अमृत 49, देवेंद्र नगर, कोल्हे हिल्स रोड, जळगाव येथील निवासस्थानी
आगमन व राखीव, रात्री 9 वा. वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9 वा.
48 मि. नी जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे
रवाना.
०००
No comments:
Post a Comment