Friday, 27 July 2018

श्रोत्यांच्या सेवेत विविध भारतीचे कार्यक्रम सुरु


           जळगाव, दि. 27 – महानिदेशक अभियांत्रिकी नई दिल्ली यांचे आदेशानुसार जळगाव येथील दुरदर्शन मेन्टेनन्स सेंटर येथे FM १०२.१  मेगाहर्टसचं प्रसारण शुक्रवार दिनांक २७ जुलै २०१८ पासून नियमित प्रसारणास सुरु झाले आहे. श्रोते एफ.एम १०२.१ मेगाहर्टस वरुन सकाळी ५.५५ ते रात्री ११.१० पर्यंत विविध विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेवु शकतील. विविध भारती सेवेचे कार्यक्रम ऐकण्याची जळगाव आणि परिसरांतील सर्व श्रोत्यांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत आहे असे विजय सपकाळे सहाय्यक निदेशक कार्यक्रम कार्यालय प्रमुख आकाशवाणी केंद्र जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment