Tuesday, 17 July 2018

पोलीस पाटील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया रविवार दि. 22 जुलै रोजी लेखी परिक्षा


         जळगाव, दि.17:- जळगाव जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी (सर्व) यांचे आस्थापनेवरील पोलीस पाटील रिक्त पदांसाठी पोलीस पाटील भरती प्रक्रिया -2018 राबविण्यांत येत आहे. जळगाव जिल्हयातील एकूण 1567 उमेदवारांची खालील परिक्षा केंद्रावर  रविवार  दिनांक 22 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वा. 30 मि.नी ते 1 वाजता या वेळेत लेखी परिक्षा घेण्यात येणार असून त्यांची बैठक व्यवस्था खालील प्रमाणे  करण्यात आली असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  
            मुळजी जेठा महाविद्यालय, तळ मजला व पहिला मजला, स्वामी विवेकानंद भवन, जळगाव पार्ट ए – एकूण उमेदवार – 480,  मुळजी जेठा महाविद्यालय, दुसरा मजला, स्वामी विवेकानंद भवन, जळगाव पार्ट बी, एकूण उमेदवार 360 , के.सी.ई सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशन ॲन्ड फिजीकल एज्युकेशन, एम. जे. कॉलेज परिसर, जळगाव एकूण उमेदवार 247, भगीरथ इंग्लिश मेडियम स्कूल, साने गुरुजी कॉलनी, पटेल नगर जळगाव, एकूण उमेदवार  240, 5) ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, एम.जे.कॉलेज जवळ, जळगाव,  एकूण उमेदवार 240,असे एकूण 1567 जागा भरण्यात येणार आहेत.
             परिक्षा केंद्रावर 100 मीटर परिसरात परिक्षार्थी व नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी वगळता इतर कुणीही प्रवेश करु नये व सदर परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा होणार नाही यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) (2) या कलमान्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. तसेच परिक्षेचे  प्रवेश प्रमाणपत्र www.jalgaonexam.com या लिंकवर उपलब्घ करुन देण्यात आलेले आहेत. सदर परिक्षेकरीता, उमेदवारांनी आपल्या अर्जात नमुद केलेले वैध मुळ ओळखपत्र व त्याची एक छायाकित प्रत तसेच प्रवेश प्रमाणपत्र व एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच परिक्षाकेंद्रावर किमान 45 मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी स्वत:जवळ अनधिकृत वस्तु , डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन व मोबाईल इत्यादी सारखी दूरसंचार साधने परिक्षा केंद्रावर आणण्यास सक्त मनाई आहे असे  जिल्हाधिकारी  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment