Saturday, 7 July 2018

अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 25 जुलैपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन


            जळगाव, दि. 7 – अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ, मुंबई मार्फत शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला- मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.
            या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (हार्डवेअर व कॉम्प्युटराइज्ड अकाँटींग ॲन्ड ऑफीस ॲटोमेशन), वेल्डर कम फॅब्रीकेटर, कंपोजींग प्रिंटींग ॲन्ड बायडींग, शिवन कर्तन कला, टंकलेखन, विजतंत्री इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकिय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे.
             तरी इच्छूक अपंग मुला-मुलींनी पालकांनी दि. 25 जुलै पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड देगलूर जि. नांदेड मो.क्रं. 9403207100, 9960900369, 7385207093, 9503078767 येथे संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment