जिनिंग
प्रोसिंग मिलच्या मालकांनी तातडीने मिल परिसर स्वच्छ करुन घ्यावा.
जळगाव दि. 18 :- कापूस पिकावरील शेंदरी बोंड अळीबाबत
परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या
शेतात शेंदरी बोंड अळीसाठीचे फेरोमन सापळे तातडीने लावण्याच्या व त्यामधील
ल्युर्स वेळोवेळी बदलण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज
केले.
कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील
शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलते होते. याप्रसंगी
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, खान्देश
जिनिंग प्रोसिंग ऑईल मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन व कापूस मिल मालक हार्षल
नारखेडे, शैलेश भोळे, अनिल सोमानी, प्रशांत संघवी, सचिन चोरडिया हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
उपस्थित जिनिंग मिलच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, बहुतांश
कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये जिनिंग प्रेसिंग मिल्स व कापूस सरकीपासून तेल काढणारे
उद्योग कार्यरत आहेत. त्यांच्या गोडावूनमध्ये कापूस व सरकी मोठ्या प्रमाणात साठवून
ठेवलेली आहे. गोडावूनमध्ये ठेवलेल्या कापूस व सरकीमध्ये बोंडअळीचे कोष मोठ्या
प्रमाणात आढळून आले आहेत.
कापूस
वरील किडसाठी सद्या पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने त्यामधुन पतंग कोष मोठ्या
प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामधुन पतंग बाहेर पडत असून ते जिनिंग प्रेसिंग
मिल्समध्ये लावलेल्या फेरोमन सापळ्यामध्ये आढळून आले आहेत. सदरील पतंग 2-3 कि.मी.
परिसरात असलेल्या आसपासच्या कापूस लागवड क्षेत्रात अंडी घालण्याची शक्यता आहे. हे
टाळण्यासाठी जिनिंग मिल परिसरात साफ सफाई करुन घेणे गरजेचे असून किडग्रस्त व
रोगग्रस्त अस्तव्यस्त पडलेला कापूस व सरकी तसेच सरकीपासून उगवून आलेली रोपे नष्ट करुन परिसर
स्वच्छ करण्याबाबत जिनिंग मिलच्या मालकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. त्यामुळे
शेतकऱ्याचे शेंदरी बोंड अळी पासून होणारे नुकसान टाळता येईल. अशा सूचना
जिल्हाधिकारी यांनी मिल मालकांना दिल्यात.
00000
No comments:
Post a Comment