जळगाव, दि. 13 - महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषि उद्योजकता विकास
प्रकल्प (ईडीपी) या विषयावर मंगळवार, दि 17 जुलै, 2018 रोजी कृषि विज्ञान केंद्र,
ममुराबाद येथे एकदिवसीय कृषि उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करण्यात आलेली
आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी दिली आहे.
या
कार्यशाळेत जिल्ह्यात कृषि, अन्न व फळप्रक्रिया संलग्न व्यवसाय चालु करण्यासाठीचे
मार्गदर्शन, व्यवसायासाठी लागणारा व्यवसाय आराखडा (प्रकल्प अहवाल), त्यासंबंधीचे
बारकावे, बँकेशी संबंधीत लागणारे विविध कागदपत्रे इ. बाबींवर तज्ञ मार्गदर्शकांमार्फत
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यवसाय करु इच्छिणा-यांसाठी मोफत व्यवसाय आराखडा
तयार करुन मिळणार आहे.
जिल्ह्यातील
उद्योग करु इच्छिणा-या शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, शेतकरी गट, बचत गट, शेतकरी
उत्पादक कंपनी यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. आमले, प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव यांनी केले आहे. कार्यशाळेसाठी
पुर्वनोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी श्री. प्रशात पाटील, मोबाईल नंबर-9404048912
यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. आमले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment