जळगाव,
दि.17:- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन
केंद्र रावेर, जि. जळगाव येथे दि. 1 ऑगस्ट 2018 पासून 99 वे प्रशिक्षण सत्र
सुरु करण्यात येत असल्याचे कौशल्य
विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन
अधिकारी रावेर कि. दे. नाईक यांनी कळविले आहे. .
प्रशिक्षणात आदिवासी उमेदवारांना विविध
शासकीय / निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा (इंग्रजी/सामान्य
ज्ञान/ गणित / बौधिक चाचणी) परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षणाकरीता
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी एस.एस.सी पास व वय 18 वर्षे पूर्ण असणे
आवश्यक आहे. तसेच उमेदवारआदिवासी (अनु. जमाती) या प्रवर्गाचा असावा. प्रशिक्षणाचा
कालावधी साडेतीन महिन्याचा असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा
रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येते.
प्रशिक्षणाकरीता इच्छूक उमेदवारांनी
दिनांक 26 जुलै 2018 रोजी ठिक सकाळी 10 वाजता, आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदिरा
मागे, स्टेशन रोड पंचायत समिती जवळ, रावेर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, यासाठी
अनुसूचित जमाती मधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्रे व
जातीच्या प्रमाणपत्राच्या व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रती, नाव नोंदणीचे
ओळखपत्र आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो तसेच बँक पासबुक ची झेरॉक्स , आधार कार्ड इ.
सोबत आणावी. यापूर्वी या कार्यालयामार्फत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी
मुलाखतीस उपस्थित राहू नये.
प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची
व्यवस्था स्वत:करावी लागेल मुलाखतीसाठी कोणताही प्रवासखर्च दिला जाणार नाही, याची
उमेदवारांनी नोंद घ्यावी, संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 0284-251906 असे कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रावेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment