जळगाव, दि. 11 - जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक -2018 चे मतदान रविवार 15 जुलै, 2018 रोजी होणार आहे. मुक्ताईनगरचा आठवडे बाजार हा मतदानाच्या दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. यासाठी रविवार दिनांक 15 जुलै 2018 रोजी भरणारा आठवडे बाजार मंगळवार दिनांक 17 जुलै 2018 रोजी भरविण्यात यावा. असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी निर्गमित केले आहे.
०००
०००
No comments:
Post a Comment