Tuesday, 3 July 2018

वस्तु व सेवाकर प्रथम वर्धापन दिन साजरा


           जळगाव, दि.3 :- वस्तु व सेवाकर भवन जळगाव येथे प्रथम वर्धापनदिन दिनांक 1 जुलै 2018 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे कुलगुरु श्री. पी.पी. पाटील यांची उपस्थिती लाभली. समारंभाचे अध्यक्षस्थानी वस्तु व सेवाकर विभाग जळगाव चे राज्यकर सहआयुक्त श्री. दिपक भंडारे, यांनी भूषविले, कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपन व कै. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शक करतांना श्री. पी.पी. पाटील सर यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे GST विषय Diploma Course  सुरु करण्यात येणार आहे व हे विद्यापीठ हा कोर्स सुरु करणारे भारतातील पहिले विद्यापीठ आहे.
         श्री.भंडारे यांनी वस्तु व सेवाकराच्या यशस्वी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले व उदभवणाऱ्या अडचणी युध्द स्तरावर सोडविणार असल्याचे सुचित केले. या प्रसंगी या विभागातील उल्लेखनिय काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.
     कार्यक्रमात BST ते GST एक प्रवास यावर श्री. आर.बी. बाविस्कर, राज्यकर अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सुर्यकांत कुमावत, सहायक राज्यकर आयुक्त यांनी केले याप्रसंगी सनदी लेखापाल, कर सल्लागार हे मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन राज्यकर निरिक्षक श्रीमती भारती पाटील यांनी केले.
०००

No comments:

Post a Comment