जळगाव, दि. 11 - विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत लिपीकवर्गीय कर्मचा-यांसाठी 1 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण पाटील, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या प्रशिक्षणासाठी 7 मोड्युलप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार यांच्या जिल्हा कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छुक कर्मचाऱ्यास प्रवेश देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. तथापी, पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्युलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
त्याअनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपिकवर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन श्री. पाटील, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.
०००

No comments:
Post a Comment