जळगाव, दि.17:- जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीसंदर्भात राज्य निवडणूक
आयोगाने दिनांक 25 जुन 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. महानगरपालिका
निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार जळगांव शहर हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता शहर हद्दीतील शस्त्र परवाना धारकांनी (विशेष सुट असलेली शस्त्रे तसेच बॅका, व विशेष
सुरक्षा प्राप्त प्रतिष्ठानांकडे असलेली शस्त्रे वगळून) शस्त्रे जमा
करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका आदेशान्वये जिल्हा पोलिस अधिक्षक
जळगाव यांना शस्त्रे जमा करणे संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी असे आदेशात नमूद
केले आहे.
जळगाव शहर महानगरपालिका निवडणूकीच्या
कालावधीत जामिनावर मुक्त झालेले शस्त्र परवाना धारक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले
शस्त्र परवाना धारक, कोणत्याही वेळी व खास करुन निवडणुक कालावधीमध्ये दंगलीत
समावेश असलेले शस्त्र परवानाधारक या तीन वर्गवारीतील शस्त्र परवानाधारकांकडील
असलेले शस्त्र तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव यांनी शस्त्र जमा करण्याची शिफारस
असलेली 96 व्यक्तींकडील शस्त्रे जमा करणेसंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, असे
जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी एका एका आदेशान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment