Saturday, 21 July 2018

अपंग शिष्यवृत्ती योजनेकरीता 31 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत


        जळगाव, दि. 21 - सामाजिक न्याय विभागातंर्गत आयुक्त, अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील अपंगासाठी शिष्यवृत्ती योजना जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांचेमार्फत राबविण्यात येते. या अपंग शिष्यवृत्तीसाठी  जिल्ह्यातील प्राथमिक/माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते.
              सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात अर्ज मागविण्यात येत असुन जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी अर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2018 पर्यत सादर करावे. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.
            अपंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करतांना अर्जासोबत विद्यार्थ्याचे आधारकार्ड तसेच बॅक खाते क्रमांकाची छायांकीत प्रत, अंपग वैद्यकीय प्रमाणपत्र, गुणपत्रकाची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज परिपूर्ण भरुन कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक यांची राहील. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्र न जोडल्यामुळे  लाभार्थ्यास अपंग शिष्यवृत्ती न मिळाल्यास त्यास प्राचार्य/मुख्याध्यापक हे जबाबदार राहतील. शासनाच्या आदेशानुसार ही शिष्यवृत्ती MAHADBT झाल्यास ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील. असे सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद, जळगाव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment