Thursday, 12 July 2018

आसोदा येथे भरिताचेवांगी रोप लागवड कार्यक्रम संपन्न


        जळगाव, दि.12:- आसोद  येथील नवनिर्मिती  शेतकरी मंडळाने आत्मा योजने अंतर्गत आयोजित केलेले भरिताचीवांगी या पिकावरील प्रात्यक्षिकाचे रोप लागवडीचा कार्यक्रम       आत्मा, जळगावचे प्रकल्प संचालक श्री. शिवाजी आमले, कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी गटाचे अध्यक्ष श्री. किशोर चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत करुन गटामार्फत सुरु असलेले सेंद्रिय शेती योजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाच्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. तसेच श्री. शिवाजी आमले यांनी  शेतक-यांनी एकत्रित येवून गटामार्फत विक्री व्यवस्था कशाप्रकारे मजबुत करता येईल. याबाबत मार्गदर्शन केले. श्री. अनिल भोकरे यांनी कपाशी पिकावरील विविध किडीबद्दल माहिती देवून प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर पहाणी करुन शेतक-यांना फेरोमन सापळे लावण्याचे आव्हान केले, यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री. एल. व्ही. तळेले व कृषि पर्यवेक्षक कृषि सहाय्यक आणि आसोदा व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.  
०००

No comments:

Post a Comment