Tuesday, 3 July 2018

शैक्षणिक वर्ष सन 2018-19 वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु आदिवासी विकास विभागातर्फे संपर्कचे आवाहन


       जळगाव, दि. 3 :- राज्यात विभागीय जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वीत आहे.
            विभागीय व जिल्हा स्तरावर, तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता, 8 वी पासून पुढे शिक्षण घेणा-या नवीन व जुने विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह  प्रवेशासाठी  http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे.
            एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल  अंतर्गत एकूण 17 आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. या सर्व वसतीगृहांमध्ये ऑनलाईन्‍ प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2018-19 करीता प्रवेश अर्ज http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहे.
            अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी (नवीन व जुने ) महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी खालील वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत ऑनलाईन्‍ अर्ज भरावेत.
            नवीन व जुन्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी वरील संकेतस्थळावर दिलेल्या user manual चे वाचन करुन त्याआधारे अचूक अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरिता प्रथम नोंदणी                   ( registration) करावी. नावनोंदणी नंतर प्राप्त user id व  password  चा उपयोग करुन अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांनी Hostel Admission  मधील  New Admission  हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा. जे विद्यार्थी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात (जुने विद्यार्थी) प्रवेशित आहेत. अशा विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. या करिता  Hostel Admission    यामध्ये  Renew Hostel Admission  हा पर्याय काळजीपूर्वक निवडून पुढील अर्ज भरावा. जुन्या विद्यार्थ्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी  http://swayam.mahaonline.gov.in या वेबसाईडच्या होम पेजवर  forgot password  चा उपयोग करावा. यामध्ये आवश्यक ती माहिती भरुन पासवर्ड रिसेट करुन घ्यावा.
            वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. वसतीगृहासाठी अर्ज करताना ऑनलाईन्‍ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील वर्षी मिळालेली गुण / गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र क्रमांकासहित, टी.सी. चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड/ प्रवेश पावती, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्यांचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे ) विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावीत.
याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहास भेट दयावी.
            सन 2018-19 आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
            अभ्यासक्रम - इ 8 वी ते 10 वी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दि. 10 जुलै 2018, नवीन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे दि. 13 जुलै 2018, निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी दि. 16 जुलै ते 19 जुलै 2018, ज्युनियर कॉलेज इयत्ता 11 वी 12 वी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 20 जुलै 2018, नविन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार  निवड यादी तयार करणे दि. 23 जुलै 2018 निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी दि. 26 जुलै ते 29 जुलै 2018, पदवी (ग्रज्यूएशन) अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 25 जुलै 2018 नविन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार  निवड यादी तयार करणे दि. 28 जुलै 2018 निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी दि. 31 जुलै ते 3 ऑगस्ट 2018,  पोस्ट (ग्रज्यूएशन) अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 30 जुलै 2018, नविन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे दि. 2 ऑगस्ट 2018, निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी दि. 5 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2018, पदविका अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 16 ऑगस्ट 2018, नविन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे दि. 19 ऑगस्ट 2018, निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी दि. 22 ऑगस्ट  ते 25 ऑगस्ट 2018, व्यावयायिक अभ्यासक्रम  अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 30 ऑगस्ट 2018, नविन विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे दि. 2 सप्टेंबर 2018, निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी दि. 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2018.
            विद्यार्थ्यांच्या निकालानुसार व विद्यार्थी व पालक यांचे मागणीनुसार वरील वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांना राहतील. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल आर. बी. हिवाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment