जळगाव,
दि. 7 – राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया हे जळगाव शहर महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता शुक्रवार दि.13 जुलै,
2018 रोजी दौर्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार
दि. 13 जुलै, 2018 रोजी सकाळी 6.13 वाजता जळगाव येथ आगमन. सकाळी 10.00 वा. जळगाव
महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व विद्यापीठांचे कुलगुरु
यांच्यासमवेत निवडणुक निर्भय, मुक्त व पारदर्शक करण्याकरिता करावयाच्या
निरनिराळ्या उपाययोजनांबाबत बैठक. सकाळी 11.00 वा. सर्व निवडणुक निर्णय अधिकारी व
पोलीस अधिकारी यांच्यासमवेत जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या
पूर्वतयारीची आढावा बैठक. दुपारी 12.00 वा. जळगाव येथून रस्तेमार्गे चाळीसगावकडे
प्रयाण. दुपारी 3.00 वा. चाळीसगाव येथे आगमन. सायंकाळी 7.42 वा. चाळीसगावहून
महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणे/लोणंदकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment