Thursday, 19 July 2018

पोलीस पाटील भरती परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 (2) लागू


        जळगाव, दि. 19 - जळगाव शहरातील 4 उपकेंद्रावर रविवार, 22 जुलै, 2018 रोजी सकाळी 10.30 ते 1.00 वाजेपावेतो पोलीस पाटील भरती परिक्षा होणार आहे. परिक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होवू नये याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1) (2) व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (2) लागू केले आहे.
            त्यानुसार रविवार, 22 जुलै, 2018 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपावेतो जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय, के. सी. ई. सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशन ॲन्ड फिजिकल एज्युकेशन, एम. जे. कॉलेज परिसर, भगीरथ इंग्लीश मेडियम स्कुल, साने गुरुजी कॉलनी, पटेलनगर, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, एम. जे. कॉलेज जवळ या चार परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हा आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हादंडधिकारी यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment