Thursday, 26 July 2018

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत 2 ऑगस्टपासून तालुकानिहाय कॅम्पचे आयोजन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

     जळगाव, दि. 26 - जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जळगावमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती इ. 10 वीतील विद्यार्थ्यांना परिक्षा फी, तसेच सफाई उद्योगात असलेल्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याबाबत 2 ऑगस्टपासून तालुकानिहाय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
      कॅम्पच्या दिवशी फक्त गुणवत्ता शिष्यवृत्ती व शिक्षण फीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
              दि. 2 ऑगस्ट, 2018 रोजी जी. जी. हायस्कूल, रावेर, दि. 3 ऑगस्ट, 2018 माध्यमिक कन्या विद्यालय, यावल येथे श्री. संजय. बी. कोळी वरिष्ठ सहायक यांचेशी संपर्क साधावा.
     दि. 4 ऑगस्ट, 2018 रोजी जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर, दि. 7 ऑगस्ट, 2018 रोजी एन. एच. राका विद्यालय, बोदवड,  दि. 8 ऑगस्ट, 2018 रोजी इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेर, दि. 9 ऑगस्ट, 2018 रोजी के. नारखेडे विद्यालय, भुसावळ,  दि. 10 ऑगस्ट, 2018 रोजी प्रताप विद्यालय, चोपडा, दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी पी. आर. हायस्कूल, धरणगाव, दि. 18 ऑगस्ट, 2018 रोजी आर. टी. काबरा विद्यालय, एरंडोल, दि. 21 ऑगस्ट, 2018 रोजी सु. गि. पाटील माध्य. विद्यालय, भडगाव, दि. 23 ऑगस्ट, 2018 रेाजी एन. ई. एस. हायस्कूल, पारोळा, दि. 24 ऑगस्ट, 2018 रोजी गो. से. हायस्कूल, पाचोरा, दि. 28 ऑगस्ट, 2018 रोजी राष्ट्रीय कन्या विद्यालय, चाळीसगाव. दि. 29 ऑगस्ट, 2018 रोजी डी. आर. कन्या विद्यालय, अंमळनेर, दि. 30 ऑगस्ट, 2018 रोजी जिल्हा परिषद, विद्या निकेतन, जळगाव येथे श्री. के. बी. बाविस्कर यांचेशी संपर्क साधवा. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment