जळगाव, दि. 9 - आणिबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना कारावास सोसावा
लागला, अशा व्यक्तींना मानधन मिळणेसाठी प्राप्त होणा-या अर्जांची छाननी व मानधन
मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती
नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे आदेश निर्गमित केले आहे.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जळगाव हे अध्यक्ष आहेत. तर पोलीस अधिक्षक, जळगाव, अपर
जिल्हाधिकारी, जळगाव, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव, उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन),
तहसिलदार (सर्वसधारण) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, अधिक्षक, जळगाव जिल्हा
कारागृह वर्ग -2, जळगाव हे सदस्य असणार आहेत. तर या समितीचे सदस्य सचिव म्हणून नायब
तहसिलदार (गृह शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव हे असणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी
श्री. निंबाळकर यांनी निर्गमित केले आहे.
०००
No comments:
Post a Comment