Monday, 2 July 2018

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची वाकडी गावास भेट पीडित मुलांची केली आस्थेवाईकपणे चौकशी


             

          जळगाव, दि. 2 : वाकडी येथील अल्पवयीन मुलांना झालेली मारहाणीची घटना अशोभनीय असून पीडित मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे  राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी सोमवारी वाकडी, ता.जामनेर येथे सांगितले.
            वाकडी येथे मागील महिन्यात अल्पवयीन 3 मुलांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री  श्री. केसरकर यांनी आज दुपारी पीडित मुलांची व त्यांच्या कुटुबियाची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड, नायब तहसिलदार परमेश्वर कासुडे, डॉ.मनोहर पाटील, अँड.प्रकाश पाटील, अँड.भरत पवार, सुधाकर सराफ यांचेसह गावातील नागरीक उपस्थीत होते.
            राज्यमंत्री  श्री. केसरकर यांनी घटनेतील पिडीतांच्या घरी जावून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपुस केली. पिडीतांना सामाजीक न्याय विभागाकडुन आर्थिक मदत देण्यात आली आहे. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबांना नियमानुसार मदत करण्यात येईल. तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment