Friday, 29 September 2017

बालाजी रथ उत्सवानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी मद्य विक्री दुकाने बंद राहणार



          जळगाव, दि.२९- बालाजी रथ उत्सवानिमित्त १ ऑक्टोबर २०१७ रोजी चोपडा, धरणगाव, पारोळा या नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परमीट रुम, बिअर शॉपी व ताडीची दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले आहे.
00000

रावेर नगरपरिषद हद्दीतील मद्य विक्री दुकाने 1 ऑक्टोबर रोजी बंद राहणार



          जळगाव, दि.२९-  मोहरम सणानिमित्त  १ ऑक्टोंबर २०१७ रोजी रावेर नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परमीट रुम, बिअर शॉपी व ताडीची दुकाने संपुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  दिले आहेत.
00000

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा



           जळगाव, दि.२९- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन  हे शनिवार दि. 30 सप्टेंबर  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शनिवार, दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी सहा वा. जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी ६ वा. १० मि.नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण, जामनेर येथे रात्री मुक्काम.
                                                                          ०००००

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा



            जळगाव, दि.२९- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा शनिवार दि.३० सप्टेंबर  व २ ऑक्टोंबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
             शनिवार दि.३० सप्टेंबर  रोजी पहाटे २ वा. ५८ वा. चाळीसगाव रेल्वे  स्टेशन येथे आगमन.  पहाटे ३ वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
            सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. ३० मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री १० वा.३० मि.नी. चाळीसगाव येथे आगमन.  रात्री  १० वा. ४० मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने मुंबई सीएसटीकडे प्रयाण.
00000

रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा



            जळगाव,दि.29- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे रविवार दि.1 ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
          रविवार दि.1ऑक्टोबर  रोजी सकाळी साडेदहा वा. बेटावद ता. शिंदखेडा येथून पारोळा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी बारा वा. पारोळा जि. जळगाव येथे आगमन व श्री. बालाजी रथाचे पुजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- श्री बालाजी मंदीर, पारोळा. दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत राखीव. दुपारी दोन वा. पारोळा जि. जळगाव येथून दोंडायचा ता. शिंदखेडाकडे रवाना.
०००००

6 ऑक्टोबर रोजी रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी



            जळगाव, दि.29:-  जिल्हयातील  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर 2017 रोजी मेस हॉल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आय.टी.आय ) जळगाव या ठिकाणी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
            या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील एकूण 9 उद्योजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. त्यांच्यामार्फत एकूण 603 रिक्त पदांसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे.
            उद्योग व्यवसाय व स्वंयरोजगारासाठी  कर्जसहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून शासनाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शनासाठी जिल्हयातील व्यवसाय प्रशिक्षण संस्था (व्हि.टी.पी) उपस्थित राहणार आहेत.  या मेळाव्यात सर्वांचे स्टॉलही लावण्यातयेणार आहे.
             शासनाच्या विविध महामंडळाकडून कर्जसहाय्य घेऊ इच्छिणा-या उमेदवारांची येथे नोंदणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून त्याचठिकाणी त्यांना अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी  उमेदवाराजवळ जातीचा दाखला, उत्त्पन्नाचा दाखला, आधार /इलेक्शन कार्ड, रहिवासी  दाखला, रेशन कार्ड,  अनुभव दाखला, व्यवसायासाठी जागा उपलब्धता इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
            रोजगार इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायेडाटा व पासपोर्ट साइज फोटो, आधारकार्ड आणि सेवायोजन नोंदणीकार्डसह उपस्थित रहावे.
  नोकरी इच्छूक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केलेली नसल्यास  https://rojgar.mahaswayam.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टल वर नोंदणी केलेली असल्यास या सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल क्र. व आधार क्रमांक पडताळणी करावी.
            रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत www.mahaswayam.in  या संकेतस्थळाला भेट देऊन  Emplorment या टॅब वर क्लीक करा. Job Seeker  हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधारकार्ड क्रमांक व पासवर्ड ने लॉग इन करा. आपल्या होमपेजवरील Job fair  हा पर्याय निवडून  Jalgaon जिल्हा निवडा.  6 ऑक्टोबर 2017 रोजी होणा-या रोजगार मेळाव्यास उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लीक करून  agree  हा पर्याय निवडा. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन apply बटणावर क्लीक करा.
            उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी ऑनलाईन‍ सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचण आल्यास 18602330133 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
          तसेच खाजगी क्षेत्रातील नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणा-या सुचीबध्द प्रशिक्षण संस्थांची यादी, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज याबाबत अधिक माहिती www.mahaswayam.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे.
           या मेळाव्याचा जिल्हयातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा आणि मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
00000