गणपती
विर्सजनाची मिरवणुक शिस्तबध्द व वेळेत सुरु होण्यासाठी शहर व जिल्हृयातील
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील जिल्हा नियोजन
भवनात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री
ची विर्सजन मिरवणूक वेळेत सुरु होण्यासाठी महापालिकेच्या गणपतीची आरती सकाळी दहा
वाजताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून लगेचच विर्सजन मिरवणुकीला सुरुवात
करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील 52 सार्वजनिक मंडळ या मिरवणूकीत सामील होणार
आहे. मिरवणूक मार्गावर 16 ठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असून याठिकाणी मंडळांचे स्वागत
करण्यात येणार आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विर्सजन मिरवणूक मार्गाची
पाहणी करण्यात आली असून त्यांच्या सूचनांनुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध
करुन देण्यात येत आहे. निर्माल्य संकलनासाठी महापालिकेच्यावतीने 22 ट्रॅक्टर उपलबध
करुन देण्यात आले असून हे सर्व स्वच्छ धुवून घेण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितले. तसेच खाजगी व वैयक्तिक गणेश मंडळांनी आपल्या गणेशाचे विर्सजन
सुर्यास्तापूर्वी करण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
मिरवणुकीवर
असणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर - पोलीस अधिक्षक कराळे
गणेशोत्सवाच्या
कालावधीत शहर व जिल्हयातील सर्व गणेशोत्सव मंडळानी चांगले सहकार्य केले आहे. सर्व
गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरीक आपल्या घरचा कार्यक्रम समजून या उत्सवात योगदान
देत असल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी सर्वांचे कौतूक करुन
आभार मानले. तसेच मिरवणूकीच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची
सर्वांनी काळजी घ्यावी. कोणी काही विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली
जाणार नाही. असे सांगून संपूर्ण मिरवणूकीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर रहाणार
असल्याचेही श्री. कराळे यांनी सांगितले. तसेच मिरवणूकीच्यावेळी या मार्गावरील
हॉटेल चालकांना त्यांच्या हॉटेलमधील शौचालये महिलांना वापरु देण्याबाबत कळविण्यात
आले आहे तर पुरुषांसाठी मोबाईल टॉयलेटची सोय करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांनी आपल्या श्रीं च्या मिरवणुकांची संपूर्ण तयारी झाल्यानंतरच त्या
मिरवणूक मार्गावर आणाव्यात जेणेकरुन इतर मंडळांना त्यांचा त्रास होणार नाही याची
दक्षता घेण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी केले. शिवतीर्थ
येथून मिरवणूक सुरु झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका रात्री आठ
वाजेपर्यत मेहरुण तलाव येथे पोहोचाव्यात अशी अपेक्षा असून याठिकाणी मान्यवरांच्या
उपस्थितीत एकत्रित आरती होणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
गणेशोत्सव
कालावधीत शहर स्वच्छ, सुंदर रहावे. निर्माल्य पाण्यात न टाकता त्यांचे संकलन करणे यासाठी
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात निर्माल्य संकलन मोहिम
राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत निर्माल्य संकलन करण्यासाठी प्रभारी महापौर
ललित कोल्हे यांचेतर्फे 10 ट्रॅक्टर उपलब्ध करुन देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात
आले. नागरीकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्याकडील निर्माल्य त्यांचेकडे
द्यावे अथवा सागरपार्क येथे निर्माल्य जमा करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले
आहे.
विर्सजन
मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे तसेच मार्गाची साफसफाई करण्याचे काम सुरु
आहे. विर्सजन मिरवणुक मार्गावर मोठ्या
गणेश मुर्तींना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, इलेक्ट्रीक वायरची
काळजी घेणे, विर्सजन मार्गावर लाईटची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. मागील वर्षाप्रमाणेच
विर्सजन मिरवणूकीच्यावेळी गणरक्षकांनी पोलीसांना मदत करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात
आले. मिरवणूक शांततेत व शिस्तबध्दपध्दतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य
करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सांगळे यांनी केले आहे. यावेळी सार्वजनिक
गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दिपक जोशी यांनी आपल्या सुचना मांडल्या
तसेच मनोगत व्यक्त केले.
बैठकीस
सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर
व जिल्हयातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, स्टॉलधारक तसेच विविध विभागांचे अधिकारी,
सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment