Saturday, 2 September 2017

महिलांनी शासनाच्‍या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा : तहसिलदार कैलास देवरे

        




वृत्त विशेष 
                                                                                                     दिनांक :  2 सप्टेंबर, 2017
महिलांनी शासनाच्‍या विविध उपक्रमांचा
लाभ घ्यावा : तहसिलदार कैलास देवरे


        चाळीसगाव दि. 2 :-  शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. महिला बचतगट  व महिला मंडळ यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण केले जाते तर रोजगार व स्वयंरोजगारमार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  तहसिलदार कैलास देवरे यांनी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव अंतर्गत असलेल्या उप माहिती कार्यालय, चाळीसगाव यांच्यामार्फत नेताजी पालकर चौक परिसरातील नेताजी पालकर मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात तहसलिदार कैलास देवरे मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी  ज्ञानेश्वर अमृतकर हे उपस्थित होते.
तहसिलदार श्री. देवरे पुढे म्हणाले की,  महिला सक्षम होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.  या योजनांची  जनतेला माहिती होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उप माहिती कार्यालयामार्फत संवाद पर्व कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेवून योजनांची माहिती करुन घ्यावी असेही त्यांनी सांगितले. श्रावण बाळ योजना, निराधार योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तहसिलदार श्री. देवरे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात परिसरातील मुला मुलींची नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी गवळी, द्वितीय क्रमांक डी.एल.ग्रुप,पवारवाडी, तृतीय क्रमांक गायत्री सोनजे तर उत्तेजनार्थ म्हणून यामिनी पवार, ओम जाधव यांना पारितोषीक देण्यात आले. यावेळी या मुला मुलींनी  आकर्षक नृत्य सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  या कार्यक्रमास नेताजी पालकर मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश महाजन, उपाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, राजेंद्र गवळी, सचिव भाऊसाहेब सोमवंशी, सहसचिव भटु गवळी, मयुर अमृतकर, मंडळाचे कार्यकर्ते तसेच माहिती कार्यालयाचे  रा. व. कोळी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या  प्रमाणात उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment