जळगाव,
दि: 22 - जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आवश्यक त्या
उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे
वळविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
यासाठी जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी कार्यालयातर्फे मृद आरोग्य पत्रिका
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या
जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत आहेत. सन 2016-17 मध्ये जिल्हयातील 1078
गावामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या गावातील 81 हजार 226 जमिनींचे मृद
नमुने तपासण्यात आले असून आतापर्यंत 3 लाख
23 हजार 786 मृद आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत.
रासायनिक
खतांचा अनिर्बंध वापर कमी करणे. मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार
खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. जमिनीचे मृद आरोग्य
सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय
खते, गांडूळ खत, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा
करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे
पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे. क्षमता वृध्दी, कृषि शाखेच्या विद्यार्थ्यांचा
सहभाग आणि भारतीय कृषि संशोधन अनुसंधानाबरोबरच राज्यातील कृषि विद्यापीठांशी
सुसंगत सहभागाने मृद तपासणी प्रयोगशाळांच्या कार्यपध्दतीत सुधारणा घडवून आणणे.
जमीनीच्या उत्पादकतेषियीच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यांमध्ये मृद नमुने
काढण्याच्या व तपासणीच्या पध्दतीमध्ये समानता आणणे व निर्धारित जिल्हयांमध्ये
तालुका, परिमंडळस्तरीय खतांच्या शिफारशी विकसित करणे. हा या कार्यक्रमाचा प्रमूख
उद्देश आहे.
या
कार्यक्रमात सार्वाधिक जामनेर तालुक्यतील 108 तर अमळनेर तालुक्यातील 102 गावांचा
समावेश करण्यात आला आहे. तर चाळीसगाव व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 33 हजार 819
तर जामनेर तालुक्यातील 30 हजार 304 शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप
करण्यात आले आहे.
मृद
नमुने तपासणीकरीता जिल्हयात शासकीय प्रयोगशाळेसह जिल्हयातील सहा खाजगी
प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. या प्रयोगशाळांमध्ये 96 हजार 750 मृद आरोग्य
पत्रिकेसाठी आवश्यक घटकांसाठी मृद नमुने तपासण्याची क्षमता आहे. यावर्षीही जिल्हयातील 750 गावांमधील 31 हजार
246 बागायती तर 31 हजार 496 जिरायती मृद नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 11 हजार
629 मृद नमुने तपासण्यात आले आहे. तर 6 हजार 219 तयार मृद आरोग्य पत्रिका वाटप
करण्यात आल्या आहेत.
मृद
आरोग्य पत्रिकांमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या आरोग्याविषयी इत्यंभुत माहिती
मिळणार आहे. तसेच जमिनीत घ्यावयाच्या पीक पध्दतीबाबतही मार्गदर्शन होण्यास मदत
होणार असून जमिनीची उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास
मदत होणार आहे.
000
No comments:
Post a Comment