जळगाव,
दि. 18 - जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 अंतर्गत विविध
कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांमार्फत 1 ते 66
नमुन्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरणेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामध्ये शेतकऱ्याने त्याचा आधार क्रमांक
संबंधित सोसायटी किंवा बँकेकडे देणे आवश्यक आहे.
ज्या
शेतकऱ्यांची परिपूर्ण माहिती भरलेली आहे त्या शेतकऱ्यांचीच माहिती ऑनलाईन अपलोड
करता येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी संबंधीत सोसायटीमध्ये,
बँकेमध्ये जाऊन आपल्या आधार क्रमांकाची माहिती द्यावी. तसेच राष्ट्रीयकृत,
व्यापारी, खाजगी बँकांनीही कर्जदार शेतकरी सभासदांना दूरध्वनीव्दारे संपर्क करुन
त्यांचे आधार क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. असे आवाहन श्री. विशाल जाधवर, जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment