जळगाव, दि.1- पोस्टाच्या कामासंबंधीच्या
ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले
नसेल. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल,
मुंबई यांचे कार्यालयात 26 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता डाक अदालतचे आयोजन
करण्यात आले आहे. या डाक अदालतसाठी 11 सप्टेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन
पोस्ट कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या
डाक अदालतमध्ये टपाल वस्तु, बचत बॅंक, मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारी विचारात
घेतल्या जाणार आहे. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असणे आवश्यक आहे. डाकसेवेबाबची
तक्रार दोन प्रतीत श्री. आर. एन. चेटुले, सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सेक्रेटरी,
डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई
जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे पाठविण्यात यावी असे
प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment