Friday, 29 September 2017

जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त 3 ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचे आयोजन



           जळगाव दि. 29 - दरवर्षी 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदे, शासनाच्या विविध योजना यांची माहिती  सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचिवण्यासाठी तसेच त्याची  अमंलबजावणी व्हावी यासाठी यंत्रणांची एकदिवशीय कार्यशाळा अल्पबचत भवन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 3 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी दिली आहे.
            या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर  यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment