जळगाव दि. 28- छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजना 2017 साठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे
ग्रामपंचायत स्तरावर 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी
चावडी वाचन होणार असल्याची माहिती उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तथा सदस्य सचिव,
तालुका जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
तालुकास्तरीय समन्वयक अंमलबजावणी
समितीतर्फे 26 सप्टेंबर 2017 रोजी अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
येथे जळगाव तालुक्यातील कर्जमाफी योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे
ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणाऱ्या चावडी वाचनासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात
आले. या प्रशिक्षणा दरम्यान महसुल विभागातील, तलाठी, कोतवाल आणि मंडळ अधिकारी,
कृषी विभागातील कृषी सहाय्य्क, कृषी विस्तार अधिकारी, आणि ग्रामविकास विभागातील
ग्रामसेवक, आणि विस्तार अधिकारी यांना चावडी वाचन करण्यासंबधी प्रशिक्षण देण्यात
आले.
यावेळी तालुका समितीचे अध्यक्ष तथा
तहसीलदार अमोल निकम, समितीचे सदस्य सचिव, डॉ. मुकेश बारहाते, उपनिबंधक, सहकारी
संस्था, जळगाव आणि तालुका कृषी अधिकारी श्री. भारंबे हे उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment