जळगाव,
दि. १५ :- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता हीच
सेवा अभियानाचा आज सकाळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ
झाला. यावेळी प्रांताधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अपर
जिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, जितेंद्र पाटील, प्रभारी
पुरवठा अधिकारी राहुल जाधव आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील व परीसरातील
कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानांत सहभाग घेवून आपले
कार्यालय व परिसराची स्वच्छता केली. श्री. निंबाळकर यांनी सर्व विभागांना भेट
देवून अभियानात झालेल्या स्वच्छतेची पहाणी करुन समाधान व्यक्त केले. आपल्या
कार्यालयाची व परिसराची स्वच्छता आपणच केली पाहिजे. यासाठी आठवडयाच्या दर मंगळवारी
पहाणी केली जाईल असे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. अडगळीत पडलेले
फर्निचर किरकोळ दूरुस्ती करुन उपयोगात आणावी, बंद असलेली दालने ज्या विभागाला
आवश्यक असतील त्यांना द्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
या
अभियानासाठी सर्व अधिकारी कार्यालयीन वेळेपूर्वी सकाळी ९ वाजता उपस्थित राहून
स्वच्छता सुरु केली.
00000
No comments:
Post a Comment