Monday, 11 September 2017

पाणी वापर संस्थांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन



      जळगाव, दि.11 :- महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणीवापर संस्था पुरस्कार स्पर्धेसाठी  प्रदेश स्तरावर व राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कार्यान्वित पाणी वापर संस्थांकडून विहित नमुन्यात प्रादेशिक स्तरावरील पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेसठी इच्छूक कार्यान्वित पाणीवापर संस्थांनी कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचेकडे नामांकने दाखल करावीत.
            नामांकनाबाबत माहितीचे प्रपत्रे उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, यावल, चोपडा, पाचोरा येथे मिळतील. नामांकन दाखल करण्याचा कालावधी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर 2017 असा आहे.
            प्रादेशिकस्तर पुरस्कारासाठी प्रथम क्रमांक रु 3 लक्ष व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांक रु 2 लक्ष व प्रशस्तीपत्रक तर राज्यस्तर पुरस्कारासाठी प्रथम क्रमांक रु. 7 लक्ष व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांक रु. 5 लक्ष व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक रु. 3 लक्ष व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
           जिल्हयातील जास्तीत जास्त पाणी वापर संस्थांनी नामांकने पाठविण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment