जळगाव
दि. 20:- शिकाऊ उमेदवारी अधिनियम
1961 अनुसार भरतीची प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने ज्या आस्थापनांना
आपल्या आस्थापनेची नोंदणी एनसीव्हीटी
एमआयएस (NCVTMIS) पोर्टलवर करावयाची असेल, त्यांनी औदयोगिक प्रशिक्षण संस्था,
जळगाव येथे 22 ते 29 सप्टेंबर, 2017 या कालावधीत सुटीचे दिवस वगळुन संपर्क साधावा. असे आवाहन
मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राच्यावतीने करण्यात आला आहे.
मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे नोंदणी करावयाची असून नोंदणीसाठी
येताना सोबत टीन नंबरी, टॅन नंबर, एमएसएमई नंबर, उद्योग आधार नंबर फॅक्टरी
रजिष्ट्रेशन नंबर, को. ऑप रजिष्ट्रेशन नंबर, ईपीएफओ नंबर यापैकी कोणतीही दोन
कागदपत्रे व ईमेल आयडी आदी माहिती आणणे आवश्यक आहे.
०००००
No comments:
Post a Comment