जळगाव, दि: २५ - जवाहर
नवोदय विद्यालय, साकेगाव येथे शैक्षणिक वर्ष 2018 साठी निवड चाचणी परीक्षा 7
जानेवारी, 2018 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत
25 नोव्हेंबर, 2017 असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य वे. नारायण राव यांनी
एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जवाहर
नवोदय विद्यालय हे भारत सरकार संचलित CBSE पाठयक्रम असणारे ग्रामीण भागातील
मुला-मुलींसाठी दर्जेदार अद्यावत शिक्षण देणारे जिल्ह्यातील एकमेव निवासी विद्यालय
आहे. प्रवेशासाठी होणारी निवड चाचणी परीक्षा पात्र ठरल्यास इयत्ता सहावी ते
बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था या शाळेत आहे. ही निवड चाचणी परिक्षा 7
जानेवारी, 2018 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियोजित परीक्षा केंद्रावर
घेण्यात येणार आहे.
या
परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मधून पालकांनी भरावयाचे आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थी पाचवीत शिकत असल्याचा मुख्याध्यापकाचा दाखला /
प्रमाणपत्राचा नमुना व ईतर माहिती www.nvshq.org या वेबसाईटवर तसेच विद्यालयाच्या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध केली जाणार
आहे. जिल्ह्यातील पालक व विद्यार्थी यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन
प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ यांनी केले आहे.
0 0 0 0
No comments:
Post a Comment