जळगाव,
दि. 18 - पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी माजी
सैनिकांच्या पाल्यांनी 15 नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
या
शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये 60 टक्के किंवा
त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी पात्र आहे. याबाबतची माहिती www.ksb.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
तरी
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी त्यांच्या पाल्यांसाठी
केंद्र सरकार (केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली) यांचेमार्फत दिलेल्या वेबसाईटवर
जाऊन ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रत व संलग्न कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
जळगाव येथे 15 नोव्हेंबर 2017 पुर्वी स्वत: आणून पडताळणी करुन घ्यावेत. विहित
नमुन्यातील सुधारित अर्ज व माहिती पत्रक मिळणेकरिता किंवा जुनी शिष्यवृत्ती
नूतनीकरण करण्याकरिता केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या वरील नमूद
केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
जिल्ह्यातील
जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक
विधवा यांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी जळगाव यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment